नाते
बिज धरतीवर पडले
नाते मातीशी जुळले
बीजाशी चढला जोम
उगवला मातीतून कोम
वरुण राजा पडला गर्जून
पोसण्यास पडले सूर्याचे उन
मातीच्या कुशीत झाड वाढले
वृक्ष होवून आकाशी भिडले
किमया निसर्गाची ही अशी
कळणार कोणास ही कशी
इथे जोडली आहे प्रेमाची नाती
कळणार कसे मानवा जाती
@ सुभाष जे. शेळके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा