गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

असा साकारला संयुक्त महाराष्ट्र


असा साकारला संयुक्त महाराष्ट्र

स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्‍ट्र चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य आस्तित्वात आले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विभर्द, मराठवाडा, खान्देश व अजूनही महाराष्ट्रबाहेरच असेलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रोत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली. ब्रिटीशांनी आपल्या राज्य कारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती, परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. 1920 मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनावेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधी यांनी मान्य केला होत. लोकमान्य टिळक हे देखील भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषत: पंडित नेहरु संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता. 

धनंजय गाडगीळ यांच्यासह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. 1955मध्ये आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत व सगळ्यांना सारखी लागू केलली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादासाठी एकभाषिकाचे तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचे. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव, कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळ ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकशी ' आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त कमी होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गजुराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्याची नव्हती, असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ साठी प्रतिमा परिणामसंयुक्त महाराष्ट्र चळवळ साठी प्रतिमा परिणामसंयुक्त महाराष्ट्र चळवळ साठी प्रतिमा परिणाम
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरुंनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालच पाहिजे', हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले. महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसतरंनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्वाचे नेते ठरले.

एस.एण.जोशी, डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्रे यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला आणि विरोधकांवर कठोर व बोचरी टीका केली. त्यांनी आपल्या भाषणांतून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

20 नोव्हेंबर, 1955 रोजी मोरारजी देसाई व स.का. पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटील यांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही' तर मोरारजी देसाई यांनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तसेच गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल', अशी विधाने केली. लोकांनी संतापून सभा उधळली. 21 नोव्हेंबर, 1955 रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 15 जणांना प्राण गमवावा लागला. जानेवरी-फेब्रुवारी 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले. मोरारजींच्या सरकारने सत्तेचा दुरूपयोग करून निष्ठूरपणे 80 लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापन
1 नोव्हेंबर, 1956 रोजी केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाला महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व 1962ला होणार्‍या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. ‍इंदिरा गांधी यांनी नेहरू यांचे मन वळविले. द्विभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरातला दहा कोटी द्यायचे व पुढील चार वर्षात ती रक्कम कमी करत आणायची, अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास आणि उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली, असा दावा गुजराती भाषिक करीत होते. त्याचे 'व्याज' म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' हे नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र' असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे 1 मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली.
('निर्मिक'च्या दिवाळी अंकातून साभार)

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

देवाकडे राजा मागणारे बेडूक


बेडूक साठी प्रतिमा परिणाम

देवाकडे राजा मागणारे बेडूक

एका मोठया तळ्यातल्या सगळ्या बेडकांनी, एके ठिकाणी जमून विचार केला की, आपण जिकडेतिकडे फिरतो, मनास वाटेल तसे वागतो, हे बरे नाही. आपणावर देखरेख करणारा कोणी तरी धनी असाव, म्हणजे त्याच्या भयाने आपण आपापल्या मर्यादेने राहू. नंतर त्यांनी, आपणास एक राजा दयावा, अशी देवाची प्रार्थना केली, ती ऐकून देवास हसू आले, आणि ‘हा घ्या राजा’ असे म्हणून, त्याने आकाशातून एक लाकूड टाकले. ते पाण्यावर आदळताच मोठा आवाज होऊन तळ्यातले पाणी उसळले, ते पाहून बेडूक भ्याले आणि लाकडापासून दूर उभे राहिले. थोडया वेळाने तळ्यातले पाणी शांत झाल्यावर, त्या लाकडाची हालचाल बंद झालेली पाहून, सगळे बेदूक हळूहळू त्याच्या जवळ गेले. त्याजवर चढून बसले आणि त्याच्याशी खेळू लागले. मग त्यांस असे वाटले की, हा राजा काही कामाचा नाही, देवाकडे दुसरा चांगला राजा मागावा. नंतर त्यांनी पुनः प्रार्थना केली. तेव्हा देवाने त्यांजकडे एक मोठा बगळा पाठविला. त्याने बेडकास खाण्याचा सपाटा चालविला, ते पाहून उरलेले बेडूक भिऊन गेले. मग त्यांनी पुन; देवाची प्रार्थाना केली की, ‘दुसरा कोणी तरी चांगला राजा पाठवावा, नाहीतर पूर्वीप्रमाणे राजावाचूनच राहू दयावे !’ ही प्रर्थाना ऐकून देव म्हणाला, ‘तुमचे मी आता काही ऐकणार नाही. मी पहिल्याने जो राजा दिला होता, तो तुम्हास आवडला नाही, तर आता तुमचे कर्म तुम्हीच भोगा !’

तात्पर्य:- ईश्वर आपणास ज्या स्थितीत ठेवतो तिचा अनादार करून दुसऱ्या स्थितीची इच्छा करू नये. तसेच, मागणे मागावयाचे ते विचारपूर्वक मागावे.

रविवार, १२ एप्रिल, २०१५

कोल्हा रानमांजर आणि ससा

 कोल्हा रानमांजर आणि ससा

 एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, `तुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.'

तात्पर्य :- एकमेकांशी शत्रुत्व करणाऱ्या दोन मनुष्यांची मैत्री झाली, की एखादया गरीबावर धाड आलीच म्हणून समजावे.

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

वाटां

 वाटां
आपणच निवडलेल्या वाटांचा , आपल्यालाच विट येतो
नवीन वाटा शोधण्या ईतके आपण कधी धीट होतो
भुरळ घालणारी कोणतीच वाट सरळ नसते
थकलेल्या जीवाला विश्रांतीसाठी मैत्री हीच हीरवळ असते...
..
                                                                               कवी- अनामिक
रस्ता साठी प्रतिमा परिणाम

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

लांडगा आणि कोकरू

  इसापने रचलेल्या नीतीकथांमुळे तो जगभर प्रसिद्ध झाला. त्या गोष्टी त्याने जरी प्राण्यांवर रचल्या तरी त्यातून त्याने माणसांना नीती शिकवली. जगात कसे वागावे हे शिकवले.

लांडगा आणि कोकरू

एका मेंढयांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते, ते एका लांडग्याने पाहिले वत्याने त्याचा पाठलाग केला. याच्या हातून आपण आता सुटत नाही असे पाहून लांडगा जवळ येताच, कोकरू हसत त्यास म्हणाले, ‘अरे, तू मला मारून खाणार, हे मी जाणूनच आहे. पण होता होईल तो आनंदाने मरावे, अशी माझी इच्छा असल्यामुळे, तू आपली मुरली थोडा वेळ मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.’ ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला. त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला. मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकून, जवळच असलेले कुत्रे धावत आले. त्यांस पाहताच लांडगा भयाने पलू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला, ‘आपला धंदा सोडून भलत्याच धंदयात पडल्यामुळे असा परिणाम झाला.’ ‘माझा धंदा खाटकाचा, तो सोडून मी वाजंत्र्याचे काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !’ 
तात्पर्य:- नादी मनुष्याला त्याच्या नादी लावून, चतुर लोक सहज फसवू शकतात.