मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

गुडबाय २०१३

गुडबाय २०१३

तेरावे वर्ष सरले, आता कवित्वउरले
संपूनकाही गेले, काही पुरून उरले

प्रस्थापितांनादिधली, लोकांनी खूप चाप
पोस्टरफाडूनिया, आला समोर “आप”

भयभीतमहिलांचे, सबलीकरण झाले
बलिदान निर्भयाचे; सत्तांतरणझाले

आलातो लोकपाल, लोकांकरिता ढाल
पाहूकरेल काय, तो गुप्त धन माल

टाळुनीआफ्रिकेला, अपुला सचिन लढला
दुर्बलतेलाठोकून, अंतिम महान ठरला

त्याटीम इंडियाची, दुर्गत हो खूप झाली
आफ्रिकीरणभूमीत, रणछोड सिध्द झाली

त्यागाचीपरिभाषा, कृत्त्याने सिध्द केली
नेल्सन मन्डेलांची, आत्ताचअर्थी गेली

लोहियापाठोपाठ, दाभोळकर गेले
पणएक विधेयक, देऊनी मात्र गेले

दाभोळकरखुनी, अद्याप न गवसला
तोतंत्र अद्ययावत, आहे तरी हो कसला?

तोक्रूरकर्मी अफझल, फाशीवरि लटकला
गुजरातचापरंतू, आहे सुरूच खटला

पडलेअता हो विरजण, आनंद पदहरण
बुद्धीबळाचा राजा, आला अता शरण

प्रकरणदेवयानी, किमया करून गेला
बंडाचीउर्मी अमुच्या, अंगी भरून गेला

थंडीतमुले बत्तीस, निर्वासितांची मेली
युपीच्यादंगलीने, किमया हो फार केली

चौदातआहे सौदा, सत्ता निवडणूकीचा
दुफळीचाआहे खेळ, इंग्रज रणनीतीचा

मंगलयान गेले, आकाशी स्वबळाने
चंद्राचीवारी शक्य, “राही”चे मन माने

- डॉ. काझी रफीक “राही”
 
 


राम

 राम
दोघांच्याही नावात
राम कॉमन आहे
नावाविरुद्ध वर्तन
काम कॉमन आहे !

एक वकील आहे
एक संत आहे
खऱ्या रामाला
त्याची खंत आहे!!

@विलास फुटाणे

 
https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQ2xLoBWO96_SEJxtMUZmyMsgMW14-RJdfnebM0lZF3BREUneN7

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

मढ….

मढ….
सुटलं एकदाचं….
यांच्यासाठीच असलेल्या…
भावनांतून….
यांनीच दिलेल्या….
वेदनांतून….

पण हे बघा….
कलावंत….
यांचा ट्राय अजून…
चालूच…
इमोशनल ब्लॅकमेल….
करत….
पिढीजात चालू असलेल्या…
रीतीरिवाजानुसार….
जणू काय….
गायनाची स्पर्धाच….
ट्रेनिंग दिल्यासारखं….
शार्प स्केल मध्ये….
हरकती घेत….
आलाप चढवत….
काहीजण वरच्या…
पट्टीत….
तर काही ….
खालच्या सुरात….

तो अगदी शांत….
डोळे मिटून…
मैफिलीचा आस्वाद घेत…
स्वतातच हरवत…
एकांतात रमलेला….
अगदी जाणकार…
श्रोताच….

काळरात्र सरेल ….
मैफिल संपेल….
आल्यापावली….
सगळे निघूनही जातील….
सुस्कारा टाकत ….
संपलं सगळ…
अशी चर्चा रंगेल…
पण खरच का ….
सगळ संपेल …??

नाही….

पुन्हा….
पहाट होणारच आहे ….
काळरात्र तर फक्त
याची…
सरली…
आज पुन्हा एकदा….
सूर्य मावळणार आहे…
मैफिल तर….
तुमचीही कधीतरी…
रंगणार आहे….
खरच….
मढ….
सुटलं एकदाचं….

@कवी : राहुल-सागर


 

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

भोग

भोग
शय्येवर मी पडाव
कोणीही येवून भोगाव,
असंख्य वेदना सोसत,
 असच का  मी रडावं !!
                                 नशिबाचा माझा भोग
                                  म्हणून का मी भोगाव,
                                      केल्या कोणी किती खोड्या,
                                    निस्तेज होवून पडाव !!
वासनेचा बळी करून
समाजानी का फसवल,
वेशेचे बाजारात नेवून,
मला का बसवलं !!
               @ सुभाष ज. शेळके  

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

शब्दा माझे चित्र तुझे..

लोकपाल
मान्य झाला
सत्याग्रही
धन्य झाला !

शेवटी अण्णा
यशस्वी झाले
निरंतर उपोषणाने
दिव्यत्व केले !!

मराठी माणूस
चमत्कार करतो
अवघा भारत
नमस्कार करतो !!!
@विलास फुटाणे

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

समलैंगिकता एक विकृती -विनाशाचा मार्ग


 


समलैंगिकता एक विकृती -विनाशाचा मार्ग

 समलैंगिक संबंधावर काही म्हणायचा आधी प्रथम  आपण  सृष्टीचीच्या प्रक्रीये पासून हा लेख सुरु करू

 सृष्टीची निर्मिती

श्री गजाननाने ब्रह्मदेवास सृष्टी निर्मितीचे कार्य सोपविले. तेव्हा ब्रह्मदेवाने  सात मानसपुत्रांची कल्पना केली. हे सातही मानसपुत्र विद्याविशारद होते. यापैकी अत्यंत बुद्धिमान अश्या मानसपुत्रास विविध सृष्टी निर्मितीचे कार्य करण्यास सांगावे असे ब्रह्मदेवाने ठरवले व आपला मानसपुत्र कश्यप यांस हे कार्य सोपविले. त्यानंतर कश्यपने  एक हजार वर्षे गजाननाची तपश्चर्या एकाक्षर मंत्राने करत राहिला. गजाननाने प्रसन्न होऊन त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. मग कश्यपाने तुझ्यासारखा पुत्र मला दे असा वर मागितला. त्याचप्रमाणे नाना प्रकारची सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्यही मागितले. गजाननाने त्यास वरदिला कश्यप याने दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांशी विवाह केला. कश्यप ऋषि यांच्यापासून देव, असुर, दानव, नाग, अश्व, गंधर्व, अप्सरा, वृक्ष, मानव यासारख्या सृष्टीतील सर्व व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाल्याची कथा ब्रह्माण्ड व भागवत पुराणात सापडते. यथाकाल दितिच्या उदरी दैत्य जन्मले. अदितीस देव आणि गंधर्व झाले. दनुस दानव झाले. कद्रु हिला वासुकी व शेष हे नागरुपी पुत्र झाले. तर विनता हिला श्येन, संपाती, जटायू व गरुड असे पक्षीरुपी पुत्र झाले. याप्रकारे पुढे किन्नर, यक्ष, सिद्ध, चारण, गुह्यक, अरण्यात राहणारे, गावात राहणारे, पशु, पक्षी, पृथ्वी, पर्वत, वृक्ष, समुद्र, नद्या, वेली, किडे, मुंग्या, धान्ये, धातू, रत्ने, मोती, वगैरे प्रकारची अनंत  मायावी सृष्टीची निर्मिती झाली. त्या काळापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव/ पदार्थ "एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. आपल्या सृष्टीचा विकास या मुळेच होत आहे. जेंव्हा ही इच्छा संपेल सृष्टी ही संपेल. आपल्या ज्ञात ब्रम्हांडाचा अंत होईल.या परमेश्वराने 'स्त्री-पुरुष' या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. सृष्टीतल्या अन्य जीवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा आपल्यात ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', 'पुरुष वीर्य' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्पष्ट आहे, स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा मूळ उद्दिष्ट संतान प्राप्ती होय. या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते व आनंद ही मिळतो. केवल यौन आनंदा साठी ठेवलेल्या स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या संबंधा मुळे समाजात विकृती पसरते. म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी (सर्व धर्म आणि परंपरेत) स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना `विवाह'` या रूपाने परिभाषित केले.
पाश्चिमात्यांचे अंधानुकरण
समाजात कश्या कश्याचे लोण आणि फॅशन येईल हे काही सांगता येत नाही. समलिंगी संबंधात काही भारतीय पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करीत आहेत. आपण कोणाबरोबर काय करतो, कुठे आणि काय बोलतो याचे जरासुद्धा भान नसते. काही परकीय देशांत समलिंगी संबंधाला मान्यता आणि कायदा केला असला तरी ही आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मनोविकारांच्या यादीतून समलिंगी संबंधांना वगळण्यात आले आहे. म्हणजेच ती विकृती नाही, तर प्रकृती आहे. परंतु मुद्दा हा आहे की, ती संस्कृती मानली जावी का?
  ही भारतीय संस्कृती नाही आणि भारतात कुठल्याही धर्माची मान्यताही नाही. मानव, पशु, पक्षी, आणि किटकांची वंशवृद्धी आणि नैसर्गिक वाढ सातत्याने आणि निकोप प्रजोत्पादनासाठी भिन्नलिंगी स्त्री-पुरुषांची परमेश्वराने निर्मिती केली. याचाच अर्थ त्यालासुद्धा समलिंगी संबंध अभिप्रेत नाहीत. नाहीतर एकच लिंगी पुरुष किंवा स्त्री परमेश्वराने त्या नियंत्याने जन्माला घातली असती.
लैंगिक शिक्षणाची गरज....
वयात येणारी तसेच रस्त्यावर, फलाटावर राहणारी मुले व बालकामगार यांना बऱ्याचदा समलिंगी संबंधाची सवय असते. त्यातील बहुतेकांना लहान वयात, लिंगसंबंधांची जाण नसताना अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची पाळी आलेली असते. त्यातून त्यांना ही सवय जडते. मग हीच मुले पुढे नवख्या मुलांना त्याच पद्धतीने रॅगिंग करू लागतात. अशा मुलांना योग्य आधार व मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे आकर्षण कमी होते. त्यांची ती मूळ प्रवृत्ती नसते, तर ती चुकीची सवय असते, हे निरीक्षण या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे. कारण यापैकी फारच थोडी मुलं स्वेच्छेने समलिंगी संबंधांकडे आकर्षित झालेली असतात. त्यांना योग्य लैंगिक शिक्षण दिले गेले की त्यांतील बहुतेकांचे समलिंगी आकर्षण संपते, असा या कार्यकर्त्यांचा अनुभव सांगतो.



समलिंगी संबंध बदलत्या काळजीचे भयावह द्योतक असून ही मानसिक विकृती, अनैतिकता आणि गुन्हा आहे हा न्यायालयाने दिलेला निकाल योग्य आहे.

आज समाजातले तथाकथित बुद्धीजीवी (अति शहाणे) समलैंगिकतेला संबंधाना आणि विवाहांना मान्यता द्या अशी मागणी करत आहे. समलिंगी संबंधाना सरकारने मान्यता देऊन कायदा केला तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. याविषयी सरकारने भूमिका न घेता गप्प रहाणे म्हणजेच आपली मूक मान्यता दर्शविणे. देशात एकीकडे स्त्रीभ्रूणहत्ये संदर्भात सरकार, डॉक्टर आणि समाजाला दोषी ठरवतो, मग समलिंगी संबंधाला मान्यता दिल्याने स्त्रीभ्रूणहत्येच्या कायदा मोडीत निघेल. एक फायदा जरूर होईल लोकसंख्या आटोक्यात राहील. समाजात बेशिस्त वाढून अराजक माजेल. अनैतिक समलिंगी लैंगीकतेने पछाडलेल्यांना कायदा आणि समाजाचे वाटोळे होण्याशी सोयरसुतक नाही. क्षणिक सुख, वासना पुर्तीचा आनंद आणि पुढारलेल्या समाजाचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यात धन्यता वाटेल. त्यांना एकाच विचारायचं आहे, समलैंगिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची 'एका पासून अनेक होण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकतो का? आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही. समलैंगिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलैंगिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुर आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव. खरे म्हणजे समलैंगिकता माणसात दडलेली एक विकृती आहे. एक मानसिक आजार आहे. योग्य डॉक्टरी सल्ला आणि चिकित्सा केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. मानसिक विकृती नेहमीच झपाट्याने कुठल्याही समाजात तीव्रतेने पसरते. समलैंगिकतेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास सृष्टी निर्मितीचे चक्र तुटून जाईल आणि मानवजाती समेत संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?