दिस पावसाचे
अल्याडच्या डोंगरात
काळे मेघ उतरले
इथे तिथे साद घुमे
दिस पावसाचे आले !
वारा गंधाळून आला
गुज मनातील ओले
उब ओळखिची हवी
दिस पावसाचे आले !
सरसर बरसात
नभ अंधारून गेले
हुरहूर अनामिक
दिस पावसाचे आले !
@ कालिंदा दि. जोशी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा